Dasbodh

Introducing Dasbodh

दासबोध हा ग्रंथ समर्थ रामदास स्वामींनी,त्यांचे पट्टशिष्य कल्याण स्वामींकरवी लिहविला. रायगड जिल्ह्यातील शिवथरची घळ या घटनेची साक्ष देत आजही अत्यंत निबीड अरण्यात विसावलेली आहे.
दासबोध हा ग्रंथ एकुण २० दशकांमध्ये विभागलेला असून, प्रत्येक दशकात १० समास आहेत.
मूळ ग्रंथ अत्यंत सोप्या मराठी भाषेतच असल्याने, मराठी बोली भाषा येणा-या कुणालाही तो सहज समजेल असा आहे. विषेशत: समर्थकालीन अन्य पत्रव्यवहार व ग्रंथरचना पहाता समर्थांनी मुद्दाम काळाच्या पुढे जाणा-या सोप्या भाषेत ग्रंथ लिहून आपला द्रष्टेपणाच अधोरेखीत केलेला आहे.असो.

एकेका समासात एक एक विषय घेऊन समर्थांनी सांसारिकांना,साधकांना,निस्पृहांना,विरक्तांना,सर्व-सामान्यांना,बालकांना,प्रौढांना,जराजर्जरांना,सर्व जाती पंथ धर्माच्या स्त्री-पुरुषांना,मानवी मनाला उपदेश केलेला आहे.   दासबोधातील एक एक समास म्हणजे जणु काही एकेका मनुष्य जन्माच्या अनुभवांची शिदोरी ठरावी,इतका ओतप्रोत कल्याण संदेश त्यात भरलेला आहे.

दासबोधाची रचना समर्थांनी मोठ्या कल्पकतेने केलेली आहे. यातील २०० समास म्हणजे जणु काही २०० वेगवेगळे प्रबंधच असून दासबोध हा त्यांचा संग्रहमात्र आहे. त्यामुळे हा ग्रंथ वाचताना, क्रमाने न जाता मध्येच कोणतेही पान उघडले तरी नक्की काहीतरी वेगळा विषय अभ्यासावयास मिळतो. त्यामुळे एकाच बैठकीत संपूर्ण ग्रंथ वाचलाच पाहीजे असे बंधनच उरत नाही. (अर्थात अभ्यासकांसाठी सक्रम वाचन हे कधीही अधीक श्रेयस्करच!)

About the speaker

[one_third][member name=”Mrs. Meera Limaye” role=”” url=”” img=”http://cs15.temp.domains/~mmvicorg/mmvic2021/wp-content/uploads/2017/03/meera_limaye.jpg” twitter=”” facebook=”” skype=”” google=”” linkedin=”” mail=””]M.A. B.ED (Retired Teacher)[/member][/one_third][two_third_last]

  • २५ वर्षे शिक्षिकेची नोकरी (विषय : मराठी व संस्कृत)
  • संत साहित्याचा अभ्यास
  • दासबोध ,ज्ञानेश्वरी  गीता यावर गेली १२-१४ वर्षे मुंबई/ठाण्यात प्रवचने करतात .
  • शिवथर घळ (दासबोध जन्मस्थान )येथे विद्यार्थ्यांची, युवकांची, वानप्रस्थांची शिबिरे होतात , तेथे अनेक वर्षे सहभाग
  • रा. स्व. संघ जनकल्याण समिती ठाणे जिल्हा उपाध्यक्षा
  • भगिनी निवेदिता ट्रस्ट ( निराधार मुलींचे वसतिगृह आणि वानप्रस्थाश्रम ) कार्यकारिणी सदस्या
पुरस्कार
  • ठाणे महापालिका ” गुणीजन ” पुरस्कार
  • रोटरी क्लब “आदर्श शिक्षक “ पुरस्कार

[/two_third_last]

From the speaker

[bloglist posts=”50″ title=”From the speaker” show_title=”no” categories=”Dasbodh”]