हौस २०१८

हौस

[hr style=”3″ margin=”5px 0px 10px 0px”]

हा कार्यक्रम २६ मे (26 May for Maharashtra Din) रोजी आयोजित केला जाईल

आतापर्यंत आपल्याला कळले असेलच की ‘हौस’ हा नूतन कार्यक्रम आपल्यातील सुप्त गुणांना साद घालतो आहे.  त्यामुळे चिमुकल्या कलाकारांनी तसेच मनाने तरुण असलेल्या प्रत्येक हौशी व्यक्तीने ‘हौस’ या सदरात हिरीरीने भाग घ्यावा.

महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित या हौस नावाच्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमात आपणासर्वांचा सहकुटुंब सहभाग असावा.

कलाकारांची वयोमर्यादा: १० वर्षांखालील आणि ३० वर्षांवरील (१० ते ३० मधील इच्छुक सभासदांना upcoming ‘युवा’ मध्ये संधी आहेच)

विषय: महाराष्ट्र दिनानिमित्त – हिंदू कॅलेंडर प्रमाणे येणारे महिने / त्यातील सण / विशेष महत्वाचा दिवस / प्रसिद्ध व्यक्तींचं स्मरण / सामाजिक घडामोडी इत्यादी

विभाग: नृत्य, नाटिका/नाटुकली, कट्ट्यावरच्या गप्पा (अभिनयासहित), कविता वाचन, स्वतः लिहिलेले एकपात्री, वेगवेगळी वाद्ये, जादूचे प्रयोग, वादन, गायन,

ढोबळ नियम:

  • पूर्ण कार्यक्रम ३ तासांचा असल्यामुळे ठराविक वेळ प्रत्येक टीम साठी दिला जाईल.

  • आपला कार्यक्रम नाविन्यपूर्ण असावा.

  • जास्तीत जास्त व्यक्तींचा त्यात सहभाग असावा, नवीन चेहेऱ्यांनाही तुमच्या ग्रुप मध्ये संधी द्यावी.

  • Repetition टाळण्यासाठी तुमच्या कार्यक्रमाचा विषय/रूपरेषा ई-मेल करावी.

कला प्रदर्शन / हौसेचे दालन (in foyer)

  • सुप्त गुण केवळ स्टेज पर्यंत सीमित  नाहीत. ‘हौशी दालन ‘ आपल्यातील विविध कलागुणांना लोकांसमोर प्रदर्शित करण्याची एक संधी आहे. हौस कार्यक्रमाच्या हॉल मधील फॉयर

  • हे दालन आयोजित केले जाईल जिथे खालील विभागातील कलाप्रदर्शन मांडण्यात येईल.

  • पैकी कुठल्याही विभागातील तुमची कला तुम्हाला सादर करायची असल्यास त्याची झलक/रूपरेषा आम्हाला ३१ मार्च (31 March) पर्यंत ई-मेल ने पाठवावी.

दालनाचे विभाग:

  • फोटोग्राफी

  • कलाकुसर

  • फ्लावर अरेंजमेंट

  • चित्रकला / पोर्ट्रेट

  • कविता

  • रांगोळी

  • पाककला

  • वाचन

  • शिवणकाम

  • Social Cause

  • Pottery

  • विणकाम

  • दागिने

  • बेकिंग

  • प्रवास वर्णन

हे विभाग नक्कीच मर्यादित नाहीत.

हे केवळ प्रदर्शन असेल. इथे commercial activity होणार नाही.

[gap height=”30″]

अधिक माहिती साठी खालील प्रमाणे संपर्क साधा.

[custom_table style=”3″]

Email Contact
 president@mmvicprod2023.azurewebsites.net Varsha Jadhav – 0423 773 922
Pramita Chaudhari – 0405 959 991
Reshma Parulekar – 0432 738 217

[/custom_table]