Kirtan Vishwa

 

नमस्कार ,

कीर्तन हा शब्द ऐकला की आपली आजी, तिच्या बरोबर रामाचं किंवा दत्ताचं मंदिर, त्या मंदिरात तिचं बोटं धरून जाणं, पांढरं स्वच्छ धोतर, सदरा, टोपी व कपाळाला गंध आणि हातात टाळ व चिपळ्या घेतलेली आनंदी, प्रसन्न पण तेवढीच गंभीर अशी व्यक्ती पाहणं व त्या व्यक्ती कडून गाणी व गोष्टी ऐकणं असं दृश्य आपल्या पैकी अनेकांच्या डोळ्या समोर उभं राहिलं असेल…

गेली शेकडो वर्षे अनेक पिढ्यांचे सांस्कृतिक, भावनिक आणि मानसिक पोषण करण्याचे काम हजारो कीर्तनकारांनी  केलेले आहे आणि आजही करीत आहेत. मात्र गेल्या काही वर्षात विशेषतः इंटरनेट आणि मोबाईल यांच्या प्रसारानंतर कीर्तने, प्रवचने आणि तरुण पिढी यांचा संबंध कुठे तरी तुटल्या सारखा दिसतो

त्याच कीर्तनाचा प्रसार एकविसाव्या शतकात नव्या पिढीला व्हावा व त्या मधून भारतीय संस्कृती, धार्मिक आणि अध्यात्मिक जीवन नव्या पिढीला कळावं ह्या भव्य संकल्पनेचं मूर्त स्वरूप म्हणजे कीर्तन विश्व (www.kirtanvishwa.org). भारताबाहेर राहून सुख वस्तू आणि समृद्ध जीवन जगत असताना मानवी जीवनाला वळण लावण्याचं विलक्षण सामर्थ्य कीर्तन कलेमध्ये आहे. त्याची ओळख आजच्या तरुण पिढीला आणि भारताबाहेरील प्रचंड मोठ्या संख्येने स्थायिक झालेल्या मराठी  समाजला सोप्या माध्यमातुन व्हावी म्हणुन कीर्तनविश्वाची ही संकल्पना तयार झाली.

गुढीपाडवा १३ एप्रिल २०२१ पासून कीर्तनविश्व या यूट्यूब चॅनेल ची सुरवात झाली व आजपर्यंत चॅनेलचे ४७ हजाराहून अधिक सबस्क्राईबर्स झाले आहेत. ह्या विषयीची माहिती व कीर्तन सादर करणारा कार्यक्रम आम्ही आपल्या सभासदांकरता घेऊन येतं आहोत. त्याचा तपशील असा

दिवस  – शनिवार ३0 ऑक्टोबर २०२१
वेळ  – संध्याकाळी ८ ते ९.३०

Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/86303357326?pwd=OXVZdkF3N1JSSTd4cDFSR25ZcmxTQT09

Meeting ID: 863 0335 7326
Passcode: 392657

Date

Oct 30 2021
Expired!

Time

8:00 pm - 8:00 pm