Hitguj 2021.

नमस्कार वाचक हो,

सालबादाप्रमाणे हितगुज वार्षिकाचा २०२१ चा ३१ वा दिवाळी अंक आपल्यासमोर सादर करताना अत्यानंद होतोय! आपणा सर्वांना, प्रामुख्याने नवीन आलेल्या मंडळींना ‘हितगुजच्या’ या प्रवासाबद्दल थोडं सांगावस वाटतं.

‘हितगुज’ हे मासिक म्हणून १९९० मध्ये कै. श्रीयुत हणमंतराव बा. उमराणीकर यांनी हस्तलिखिताच्या रूपाने सुरु केले. श्री. उमराणीकर यांची बेंडिगो येथील ग्रंथालयात ग्रंथपालाच्या जागेवर नियुक्ती झालेली होती. लेखक आपल्या हस्ताक्षरांत लेख/कविता/ललित लेख इ. लिहून देत आणि संपादक या सर्वांची जुळणी करून हितगुजचा अंक सादर करीत. त्यानंतर टंकलिखित अंक निघू लागले. हा क्रम बरीच वर्षे चालू होता. हितगुज टंकलिखित अंक प्रथम तिमाही होता. त्यानंतर तो सहामाही झाला आणि आता गेल्या काही वर्षांपासून तो वार्षिक स्वरूपाचा झालाय. त्याचबरोबर अंक ऑनलाईनही प्रकाशित होऊ लागला. परंतु, एक गोष्ट मात्र मानावी लागेल, की अनेक स्थित्यंतरांतून जाऊनही वर्षातून एकदा का होईना, हितगुजचा दिवाळी अंक आपल्या सेवेला हजर असतो.

दिवाळीच्या फराळाचा खुसखुशीतपणा, चटपटीतपणा आणि गोडवा यांचा एकत्रित प्रत्यय २०२१च्या हितगुजचा दिवाळी अंक वाचतानाही येईल. निरनिराळ्या विषयांवरील उद्बोधक लेख, मनाला चटका लाऊन जाणाऱ्या कथा, आणि आपल्याला कल्पनाविश्वांत रममाण करणाऱ्या कविता, हे सारं काही मिळेल या वर्षीच्या हितगुज मध्ये.

गेले काही महीने सर्वांना वेठीस धरणाऱ्या कोविड-१९ नावाच्या राक्षसाची शक्ती आता हळू हळू क्षीण होत चालली आहे. त्याचा विळखा आता शिथिल होत चालला आहेत. लवकरच सगळे प्रतिबंध दूर होऊन मोकळेपणी एकमेकांना भेटता येईल अशी आशा करावयास हरकत नाही. तथास्तु !

महाराष्ट्र मंडळ, व्हिक्टोरियाच्या कार्यकारिणी समिती आणि हितगुजच्या संपादक समिती तर्फे वाचकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

Hitguj 2021 Magazine is available for download : Click Here

Thanks to our Hitguj Editorial Team for 2021

  • Dr. Jayant Bapat (kaka)
  • Nalini Bhujang
  • Aditi Kirtane
  • Mukti Prabhu
  • Rajendra Shirke
  • Sheetal Deshpande
  • Amolika Ringe
  • Pranav Jatkar
  • Yashwant Jagtap