नमस्कार वाचक हो, सालबादाप्रमाणे हितगुज वार्षिकाचा २०२१ चा ३१ वा दिवाळी अंक आपल्यासमोर सादर करताना अत्यानंद होतोय! आपणा सर्वांना, प्रामुख्याने नवीन आलेल्या मंडळींना ‘हितगुजच्या’ या प्रवासाबद्दल थोडं सांगावस वाटतं. ‘हितगुज’ हे मासिक म्हणून १९९० मध्ये कै. श्रीयुत हणमंतराव बा. उमराणीकर यांनी हस्तलिखिताच्या रूपाने सुरु केले. श्री. उमराणीकर यांची बेंडिगो येथील ग्रंथालयात ग्रंथपालाच्या जागेवर नियुक्ती झालेली […]
